एकच चित्र किती बोलकं …

admin

कॉलेजला असताना सचिनचे काम पहायला मिळायचे ते पैच्या कॅन्टीन मध्ये स्केचेस च्या रूपात…
सचीन ..साविया ..श्रेयश .. जयंत .. मयुरेश .. सुधीर … भाग्यश्री .. माधव आणि इतर काही ..अशी ही एक गॅंग होती. मी एक वर्ष सिनीयर असल्यामुळे त्यांच्यात पार्ट टाईम डोकावत असे.
इतरांपेक्षा खूप शांत शांत असायचा हा … त्यामुळे समंजस वगैरे वाटायचा ..तसा आहेच ..
खूप वर्षांनी भेट झाली ते २०११ मध्ये.
तेव्हा बाईक राईड .. मुंबई ते औरंगाबाद … तेव्हा कलेसंबंधी विचारांवर काही चर्चा झाली.
ये लडका भन्नाट बोलता है .. असे वाटून गेले ..

त्यानंतर २०१२ .. मुंबई ते लेह .. बाईकींग टूर वेळेस आम्ही पाच सहा बाईक सोबतच होतो.
आम्ही काही कलाकार व इतरही क्षेत्रातील मित्रमैत्रिणी होते… त्यामुळे कॉलेज स्ट्डी टूर्स नंतरचा ही टूरही एक एकत्रीत सुपर्ब अनुभव.

खरच सचीन आणि स्वाती .. दोघेही Casba निमीत्त वेगळे काही करत असतात …. आणि भारतीय व पाशचात्य कलेसंबंधी ऐकत रहावे असे काही न काही असतेच तेथे.
सचिनच्या तोंडून स्वत:चे ब्रेनवॉशही करून घ्यावे असे वाटत राहते … तो घरी आला … बोलू लागला की नवे नवे विषय सुचतात अन् झोपायला जावे तर रात्र सरलेली असते.

बाळाचा सर्वांगीण विकास व्हावा असे जेव्हा आपण कलाकार झटत असतो नै …. तेथे एक कलाकार म्हणून व्यवसायीक झाल्यावर कले व्यतिरीक्त इतर विषय आपण कलाकार ठामपणे हाताळू शकत नाही ..मग मी कलाकार ..हे काम मी का करावे म्हणून बरेच कलाकार माघार घेतात. कलाकाराने सर्वत्र सतर्क राहीले पाहीजे हे सचीन कडून नेहमी शिकायला मिळते… आणि अशा काही अनेक मित्रांमुळे नवनविन विषयात वेगवेगळे धाडसी प्रयोग करत रहायची इच्छा प्रबळ होऊ लागते.

त्याचे कमर्शीयल काम पाहत आले …
पण हे ..सध्या सुट्टीतले काम मला खूपच आवडले. म्हणून येथे देत आहे.
सचीन तू बोलतोसही छान ..
असेच छान कामही करत रहा ..
bhavna. 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Youtube