तुम्ही कधी पाहिला आहे का असा कृष्ण ..

admin

तुम्ही कधी पाहिला आहे का असा कृष्ण … नेहमीच कसा सुंदर दिसणारा व  चेहर्यावर प्रेमळ मोहक हावभाव दर्शविणारा पाहीला आहे मी. तो वनात प्राणि पक्षींसोबत वृक्षाखीली एका खडकावर बसून सुमधूर बासुरी वादन वगैरे सगळेच ते ऐकण्यात मग्न कसे मोहून गेलेले असतात नै … हे सर्व नेहमीचेच आहे पण एकटाच तो कृष्ण कपाळावर आट्या घेऊन विचारात रमलेला कधी कुणी चित्रीत केला असावा का?

खास करून काय ही मीरा .. अशी कशी ही वेडी … असे मनातल्या मनात म्हणत ओठांवरची बासुरी अल्गद बाजूला करत कपाळावर आट्या आणून तिरक्या नझरेने मिरेला पाहतोय जणू. तर मीरा आपली रमलीय … त्याचेच गुण गाण्यात … गावभर त्याच कृष्णाचा जप करत फिरत अगदी लयीत भजनात रमली आहे. ती पात्र जरी दैवी असले तरी ह्या अशा हावभावामुळे काल्पनिक न वाटता आपलेसे अधीक वाटत आहेत. 
काही चित्रकारांची  चित्रे काळाच्या ओघात भरकटणारी नसतात. आपल्या आजुबाजूला पसरत चाललेला भडकपणा .. भपकेपणामुळे त्या ठराविक  चित्र शैलीला काही फरक पडत नाही. खूप हळूवारपणे ते पात्र .. तो विचार कागदावर उतरलेला असतो की अगदी एक एक रेष, ठिपका, आकार एखाद्या फुलपाखराच्या पंखागत त्यावर फक्त रचले असावेत. मग इतक्या हळूवार नाजूकपणे कामात शोधूनही खोट सापडणे कठीण. अशीच काही चित्र बंगाल चित्र शैलीत साधारण स्वातंत्र काळात  निर्माण केली गेली.  अबनिंद्रनाथ टागोर, नंदलाल बोस, मजूमदार, अबालाल रहमान हे तेव्हाचे चित्रकार. कागदावर पारदर्शक जलरंग विशिष्ठ पद्धतिने वापरला जाऊ लागला आणि बंगाल शैली उदयास आली. स्वातंत्रयानंतर माणसाचे माणुसपण बदलू लागले तसे कला क्षेत्राही बरेच बदल होऊ लागले. फॅशन बदलावी तशी कलेतही नवनवीन ट्रेंड दिसू लागले. जेवणातील  जसे जगणे बद्दल तसेच जीवन शैली प्रमाणे कलेमध्येही विविध बदल घडत असतात. कलेतील या बदलांना समकालीन किंवा कंटेम्पररी आर्ट म्हणून संबोधले जाते. लोकांना सगळीकडेच बदल हवा असतो मग तो बदल कलेतही दिसून येतो. फास्टफुडप्रमाणे कलाक्षेत्रातही ट्रेंड किंवा फॅशनप्रमाणे नवनव्या कलापकार उदयास येतात आणि संध्याकाळ व्हावी तशी लुप्त होतात. 
   मोनल कोहाड हे आजचे कलाकार पण यांची चित्र मला नेहमी बंगाल जलरंग वॉश टेक्निकची आठवण करून देतात.  स्वतंत्र पुर्व काळात बंगाल स्कुल मधील जलरंग पाहिलीकी बटबटीत जग नकोसे होऊन साधेपण्याने जगण्याची ओढ लागावी तशी त्यातील पारदर्शकता आपल्याला त्या प्रकाशात खेचून धरून ठेवते. तरल .. एकमेकांत मिसळलेले प्रत्येक रंगाचे ठराविक प्रमाण व त्या जाडसर मऊ ब्रशने पसरलेले पाणीदार फ्लो अगदी जणू स्वर्गच … आणि त्यावर बारीक रेखांकनाने भरत चाललेली आकृती, पाने फुले नक्षी इत्यादी. 
मोनल कोहाड यांनी रेखाटलेली रामायण महाभारतातील प्रसंग खूप सहज मनात घर करू लागतात. मला बर्त्यायाचदा एखाद्या चित्रावरून एखाद्या प्रसंगाची, गोष्टीची आठवण होते आणि नव्याने त्या अध्यात्मिक विषयांचा अभ्यास करावासा वाटतो.  जर राम रेखाटला असेल तर हो असाच असावा ..इतका हुबेहूब असे काहीसे जाणिव करून देणारे चित्र. 
ती अल्लड राधा .. तो बासुरीत रमलेला कृष्ण कधी तर कधी अर्जुनाला उपदेश देणारा नाकडोळे अगदी नाजूक लोभस  तरी तितकाच धीट कृष्ण जणु संपुर्ण गीता ज्याच्या विचारात सामावली आहे. 
मध्यंतरी त्यांनी रेखाटलेली कित्येक पात्र पाहिली आणि ह्यापेक्षा खरेपणाने दुसरे काही असूच शकत नाही असा काहीसा माझा ठाम विश्वास बसू लागला.. तो राम असो वा कृष्ण .. ती मिरा असो की राधा… ते पात्र मनामध्ये घर करून जावे असे काहीतरी. 
माझे आवडते कृष्ण आणि ही मीरा …. त्यात हा कृष्णच घ्या ना .. त्याचे हे असे हावभाव कधी कुठे पाहिलेत का? थोडासा खडूसच म्हणायला हरकत नाही. त्या मिरेकडे त्याने नेहमीच  कानाडोळा केला हे काही खोटे नाही. ती मीराही वेडी .. त्याच्या प्रेमात तिने वैराग्य स्विकारले आणि तिला तिच्या जगण्याचा सार आपोआप गवसला. गावोगावी कृष्णाच्या ओव्या गात हींडत राहिली .. ना घराची चिंता ना भविष्याची काळजी. 
तेथे राधेसोबत कृष्णाला बालपणात सोबत असली आणि माणसाने पुजतानाही राधाच सोबत ठेवली तरी मिराही नारागसपणे एकल प्रवासात कृष्णामध्ये रमली. तिला जगाची चिंता नव्हती. कदाचित ती आपल्याला स्व शोधणं आणि स्व मध्ये रमणं हे अधीक शिकवते.
कृष्ण भक्तीत, त्याच्या प्रेमात रमलेली त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं तरी कसलाच अट्टाहास न करता ती भक्तिरसात न्हाऊन निघाली व त्यातूनच अवीट दोहे रचले गेले…. मोनल कोहाड यांची इतर चित्र, रेषा व रंग पद्धती मला खूप आवडतात पण मी ही दोन रेखाटने निवडली आहेत.
 तो कृष्ण , ” काय ही वेडी मीरा म्हणत कपाळावर आट्या ओढून तिरक्या नजरेने तिला पाहतोय आणि मीरा मात्र हे माहीत असूनही त्याचेच नामस्मरण करत त्याच्या धुंदीत डोहे गात फिरतेय … हे किती तंतोतंत रेखाटलय नै !
…………..bhavna sonawane . December 2020.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Youtube