पॕरीस डायरीज .
पॕरीस डायरीज ..
2007 साली मी अनुभवलेल पॅरीस…
विविध कलांनी नटलेलं हे शहर.
जगातील प्रत्येक कलाकाराने एकदातरी भेट द्याव असं हे शहर..
कला आणि विज्ञानाचं सुंदर एकत्रिकरण असलेलं हे शहर …
प्रत्येक गल्लिबोळाचं वैशिष्ठय असलेलं हे शहर …
शहराच्या मधोमध वाहणारी सिएन नदी …
त्या कडेने चालत राहा …
विंडो शोॅपिंग करा …
शनिवार च्या ओपन मार्केटना भेट द्या …
छोटीमोठी कला दालनं पाहत फिरा …
रसत्याकडेने विकत मिळणारी पुस्तकं चाळा …
माझ्या चित्रांमधून वेळ मिळाला की हेच काय ते काम.
निटनेटकं असं हे शहर…छान प्लॅनिंग …
एखादी महत्वाची इमारत गर्दीत अशी रचलेली आढळेल की लांब गेल्यावरही स्पष्ट दिसत असेल.
दुरवर कुठेही गेलं तरी आकाशात डोकावणारं ते Eifiel tower …
ती छबी मनामध्ये घर करून राहिली … भारतात परतल्यावर आजही एखादं टाॅवर मला tour eifiel ची आठवण करून देतं.
शनिवारी नदीच्या काठी गीटार , मित्रमैत्रीणी , वाईन आणि रात्रभर चालणार्या गप्पा.
सकाळसंध्याकाळ माझ्याच इमारतीत सुरू असलेला पियानोचा रियाज …
दर अठवड्याला होणारे गायन ..वादन.. नृत्य…
जगातील विविध देशातील कलाकार …
हे सर्व अनुभवायला माझ्यासाठी अडीच महीने खूप कमी होते.