बेडूक आणि माणूस
बेडुक माणसासारखाच असतो ..अगदी माणसासारखा !पहाटेपहाटे मी दार उघडायला निघालेच होते की एक अडीच इंची बेडुक खालच्या खोलीत “ती आली ..ती आली” करत बाहेरचा रसता शोधत जमिनीवर ठेवलेल्या सामानाच्या आत शिरायच्या प्रयत्नात अंधारातच तडफडत होता.ते भलं मोठं सागवानी रात्रीच घट्ट लावलेलं दार … आत शिरायला कोठून जागा मिळते ह्यांना कय माहीत?एक पेपर रोल हाती लागला आणि त्याला त्या दारातून बाहेर निघायचा रसता दाखवला .. डोक्याला रोल लागताच डोक्याने रोल संपुर्ण ताकतीने जोर लावून माझ्याकडेच ढकलत होता .. ऐकायलाच तयार नाही .बरं मग थोडी ताकत लावली अन् त्याला ढकलतढकलतच पाच इंची ऊंबरठा चढायला लावला ..आणि तेथून वरूनच ढकल्ला….मी मदतच तर करत होते त्याला ….माणसाप्रमाणे त्यालाही दुसर्यावर सहज विश्वास नाही … बाहेर पडताच उजेडामुळे झोपेतून जागा झाल्याप्रमाणे आजुबाजूला पाहत आनंदात उभ्याउभ्या दोन उड्याही मारल्या अन् ग्रीलच्या दिशेने निघाला ..आता गाडी पुनः ग्रील मधे आडकलीच …ते झाडाच्या कुंडीतलं एक वडाचं पान त्याने डोकावताना पाहिलं..नी हायसं वाटलं.एकएक हालचाल त्याच्यामेंदूचे व चेहर्याचे निरागस हावभाव सांगते…..आहे की नै माणसागत? ……..Bhavna Sonawane. October2018ReplyForwar