मातिचा सुगंध एकदा …
मातिचा सुगंध एकदा …
मातिचा सुगंध एकदा
गंध पावसाचा हवा होता
माझ्यासाठी ….त्या चित्रासाठी
तो…. मला हवा होता
मन वेडं शोधत रहायच
गल्लीगल्लीतून शोधायचं
एका पहिल्या पावसातला ‘ तो ‘
मन माझ्याच चित्रांमध्ये शोधायचं…
माझ्या प्रेमात वेडा कधी
कधी एक गुलमोहर तो…
बरसणारा पाऊस कधी
कधी मोगर्याचा सुगंध तो
आठवणीतला बहर कधी तो ….
मला त्याचा सुवास सापडला
एका बोहरीच्या दुकानात
मला ‘ तो ‘ बंद बाटलीत सापडला
चक्क विकत मिळाला…
‘ मिट्टी का सुगंध पावसाळी ‘
हो कालच मला ‘ तो ‘
एका चोरबाजारात सापडला…..
….bhavna.