लहाणपणी ॲक्ट्रेस बनायचं स्वप्न पहावं …..

मनात येइल ते भरपूर शिकावं …आयुष्यभर शिकत रहावं ..
हो थोडा पैसाही कमवावा …
पुन्हा शिकावं …
आता आपण मोठे झालो नै ..
आता छोटी स्वप्न पहावीत ..
पुर्वीच्या मोठ्या स्वप्नातील काही आपोआप आपला पिछा करतात ..कधीतरी आपल्याला एखादं स्वप्न गाठतंही …
खूप छोटीछोटी स्वप्नही पहावीत ….
साधारण अठवड्याला एक म्हट्लं तरी महिन्याला चारपाच ..वर्षाला पन्नासएक …
बरीचशी स्वप्न विसरली जातात ..पुनः रीपोस्ट होतात …
आणि ढीगांनी रिजेक्ट होत राहतात …
रिजेक्ट होतात ढिगांनी…
पण दहा पैकी एखादं छोटसच पुर्ण होतं …
आणि ते तेवढच आपलं असतं ..
आपलं स्वतःचं …
रिजेक्ट झालेली आपला पाठलाग करून कालांतराने आपल्याला गाठू पाहणारीही बरीच स्वप्न ..त्यातील काही पुढे थकून आपला पाठलाग सोडतातही …
पण स्वप्मय ..हा आपला स्वभावगूण …पुनः नकळत त्या मागे पडलेल्या स्वप्नांना सोबत घ्यावं …
तो ..वर्षभर अर्धवट रंगलेला मोठ्ठा कॕनव्हास पुर्ण करायला घ्यावा म्हणजे नवीन स्वप्नांना आपोआपच जागा होते …
आणि एक दिवस ती छोटी विसरलेली स्वप्न नकळत आपल्यालाच शोधत येतात … कोणाचंतरी एक मोठं स्वप्न पुर्ण करण्यासाठी !
आणि त्यात आपणही सामावलेलो असतो !!
….. Bhavna.2019.March29.