शांताल ज्वीमेल

admin

शांताल ज्वीमेल 

Chantal Jumel ही माझी फ्रेच मैत्रीण. हिच्या चित्रांमध्ये मला माझा भारत नव्याने सापडतो.

 चांतलशी माझी ओळख साधारण चार वर्षांपुर्वी तामिळनाडूच्या तिच्या चित्रप्रदर्शनात झाली.

पातळ लाइफसाइज राइसपेपरवर लालसर पेन नी संपुर्ण  ओँकार .. त्यातच आकार ..माणसे .. प्राणी पक्षी ..पाणी ..आकाश … सहसा बहाय्य रेश नाही ..

टिपीकली फ्रेंच शरिरयश्टी तरूणपणात 1980 मध्ये दक्षिण भारतात राहून शास्त्रोक्त पद्धतिने कथकली नृत्याचे शिक्षण .. लेखन … तसेच कालांतराने चित्रणही ..करत असलेली चांतल.

चित्रात कुठेही बटबटीतपणा नाही … लय ..ताल .. एकसंघता .. सुसंगती .. किती साधेपणाने दर्शविते .. तरी चित्र संपुर्ण वाटते.

जितकं नाजूक ..लयदार .. तितकच प्रभावी  …

जरी  शांत ..तरीही  फिरत्या रेशा …

कुठेही आकारांचा दिखावा नाही ..सरळ साधेपणाने जसे भावले तसे रचलेले आकार …

 I am basically a writer म्हणत चांतलने तिची ओळख सांगितली होती. अर्थकलर मधला चुढीदार …ओढणी ..मोठे रिंगा व कधीकधी टिकली हा तिचा पहराव.

काही वेळाने  एकच अक्षर गिरवत गिरवत मला मेडिटेटीव  फिलींग येतं म्हणाली .. आणि तो राइसपेपरही असाच व्यापला जातो.

हे सुरूवातीला साधं वाटलं तरी लक्ष ….दशलक्ष वेळा ओँकार लिहीणं ..म्हणजे नकळत तेवढा उत्चारणंही आलंच.

आणि समोर त्या पातळ राइसपेपर च्या पोतावर दिसू लागतं ते भारताचंच रूप.

चांतल वर्षातील काही महीने तामिळनाडूत राहते तर काही महिने फ्रांस ला असते . भारतात पारंपारीक दाक्षिणात्य ठिपक्यांची  रांगोळी चा अभ्यास करते ..ते देखील अगदी लयीत तिच्या चित्रांमध्ये उतरवते .. तर फ्रांसमध्ये घराच्या बगिच्यातील फुलझाडांमध्ये स्वतःला वाहून देते.

किती छान वाटतं ना हे ऐकायला .. एखाद्या कलाकाराचे आयुष्य ..मस्त जणु भिरभीरणारं ..पण  प्रत्येक बहाय्य सुंदर दिसणार्या कलेच्या मागे साधना व खडतर प्रवासही  असतो.

त्याच्या साध्या सरळ निर्मळ आकारात व अल्हाददायक रंगात जणु तो आयुष्याचा खडतरपणा लुप्त होतो…

खरंच आपल्यातला हरवत चाललेला भारत कधीकधी अभारतीय कलाकारांमध्ये नव्याने  सापडतो.

 ……. Bhavna Sonawane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Youtube