उजी

admin

उजी


मी दहावीलला होते ..
ऊजी नउवीला … माया सहावी ..येगेश सातवीला.

गावी गेलो होतो …
छान गट्टी जमली होती आमची.
अगदी धम्माल करायचो तेव्हा.
माया आमच्यात नसायची 
पण, यंदा सुट्टीला आली होती.

आज मच्छिंद्र गड चढायचं ठरवलं होतं.
सकाळी मा..बाबा..काका..काकू सोबत पायथ्याशी  कसे आलो आठवत नाही..
पण आज फार मज्जा येणार होती.
 . बहुतेक सोबत आजी असावी ..
शिदोरी पाणी सोबत घेतलं होतं.

ह्रशिकेश अगदी सात महिन्याचा असावा..
आमची वर चढताना रेस ..उतरतानाही रेसच. 
ती पायवाट .. करवंदाची झुडूपं…
आमच्यासोबत 
कडेवर बसून खिदळणारा ह्रशि….

कुठेही असलो तरी आम्ही दिसायची खात्री होती. 
उजवला ने पोॅलियस्टर फ्लुरोसंट पिंक परकरपोळकं घातलं होतं. 
अगदी त्या डोंगरावर झुडपांच्या हिरवळीत एक गुलाबी टिपका सरकताना दिसायचा.

मला आवडायचं नाही….हिने असं परकरपोळकं  घातलेलं.
तेव्हा गावी मुली वयात आल्या की परकरपोळकं घालायची पद्धत होती.
उजवला माझी आत्येबहीण.
तिच्या वडिलांनी सांगितलं आणि ती मोठ्या मुलींसारख वागू लागली.

ते काही स्वस्त नसायचं ..
एकदा हिशोब पण करून दाखवला तिला.
म्हट्लं ..
बघ !! मिटरप्रमाणे कपडा आणि  टेलर चे मिळून किती होतात..त्यात तुला दोन ड्रेस झाले असते . 
तिने मात्र शांतपणे होकारार्थी मान हलविली.

मला वाटलं माझ्या  अशा बोलण्याने कदाचित तिचा विचार बदलेल.
त्यात रंगा व्यतिरीक्त कसलीच वरायटी नव्हती.
तयात ती धावताधावता पाय अडखळून पडेल की काय .. असं वाटायचं.

 स्वतः च्या  मळयातील ऊस सोडून 
दुसर्याच्या मळयात चोरून तांबडा ऊस खायला घुसायचो.
ती आम्हाला घाबरवायला रानडुकराच्या गोष्टी सांगायची 
आणि पळत सुटायची.
एखादी बकरी चरायला घेउन जायचो 
मोकळ्या  आभाळाखाली …
आमच्या शर्यतीत तिलाही शामिल करायचो.

ऊजीचं परकरपोळकं  ..
तिचे कपडे ..
ती एक चाहूल होती ..
ऊजवलाचं शिक्षण अपुर्ण राहणार ह्याची ..
लवकरच तिचं लग्न करणार ह्याची …
                …..bhavna . dec2015.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Youtube