‘ The Floating Homes ‘ ….my Paris Diaries.
तरंगणारी घरे ….
कॉलेजला असताना मी पॉव क्ली जितका मिळेल तितका वाचायची… तरी शोधत रहायची. लायब्ररीत पॉल क्लीचे जुने पुस्तक होते आणि नंतर गावडे सरांनी वर्गासाठी बनवलेली एक खास लायब्ररी होती त्यातही एक पॉल क्लीच्या चित्रांचे छोटे पुस्तक होतेच.
पॅरीसच्या मी राहत असलेल्या इमारतीच्या बाहेर पडले की रसता क्रॉस करून सिएन नदी … पों. मारी नावाचे ब्रीज. तेथेच फुटपाथवर कमी किमतीत मिळाले ते रेम्बरा, लियोनार्दो मायकलॅन्जिलो, एद्गर देगास, पॉल गॉगीन, व्हॅन गॉग याच्या फ्रेंच अवृत्या.
मी वेडी .. कित्येक दिवस तेथेही पॉल क्ली शोधत राहीले पण सापडेना. एकीकडे भारत …तर उरलेला बाकी मोठा जग …. खंड गेले चुलीत म्हणत वावरणारी मी !
एखाद्या जर्मन चित्रकाराचे पुस्तक फ्रांस मध्ये सहज सापडणे कठीण हे गणितच कळले नव्हते मला.
पण क्लीची दोन ओरिजीनल छोटी चित्रे पॉम्पीड्यू म्यूझियम मध्ये पहायला मिळाली ते माझे भाग्य.
त्या दर्मयान तेथे माझ्या एकल चित्रप्रदर्शनाची तयारी सुरू होती आणि क्लीच्या विरहात घडलेले हे एक.
एके दिवशी प्रदर्शन पहायला आलेल्या गोस्वामी आडनाव असलेल्या चित्रकाराने मला ह्या चित्रावरून टोबणा मारला तेव्हा कुठे मी जागी झाले. त्यानंतर कित्येक वर्ष चित्रनिर्मीती करत असताना माझ्या चित्रातून क्ली डोकावत तर नाही नं ..ह्याची खात्री करू लागले.
हे चित्र आज कोणाकडे आहे मला माहीत नाही. पण ज्याच्याकडे असेल तो ही नकळत पॉल क्ली चा चाहता नक्की असेल .
त्या रेसिडेंसी मध्ये महिन्याभरात क्लीला शोधत आणखी काही अशीच चित्र हातून घडली. त्यात हे सर्वात खास हृदयात वसलेले.
Bhavna.june.2020.