चित्ररूप ..

admin

आकार तू

रंग तू

रेशा तू आणि बिंदू ही तूच !

हे सर्व जुळते अन् एक भावना घडते खरी …

जगण्यात मागे सोडलेली साठवण 

सतत सोबत घेऊन चालत  .. 

त्या  बेरंगी पोतावर

 मी जुळवा जुळव करत असते खरी …

ते एकत्रीत घडत जाणारं सुंदर

एक रूप समोर चितारत असतं .. 

तेव्हा पुर्वी अधूरी मी ..

माझ्यात काहीतरी हरवलेलं असतं … 

तेव्हा मीपण अधुरं रहावं .. वर्षानुवर्षे 

आणि आता हे चित्ररूप पुर्ण व्हावं 

एक जगणंज कोणी अधुरं ठेवाव 

आणि निघून जावं जणू नकळत …

तुझीच साठवण होऊन  जन्मभर मला साथ द्यावं ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Youtube