मकबूल फिदा हुसैन … बस.. नाम ही काफी है !
दर दोनचार वर्षांनी मी नक्की ही सही कुठे जपून ठेवलीय हे विसरते.
आज पुन्हा आठवण झाली ..
नशीब सापडली.
१९९५ ला एल एस रहेजा, फाऊंडेशन वर्गात नुक्तेच पदार्पण केले होते.प्रकाश भिसे सर व मुकूंद गावडे सरांनी तेव्हा शनिवारी आमचे आऊटडोअर स्केचिंग सुरू केले होते. सुरूवातच असल्यामुळे कधी जहांगिर आर्ट गॅलरी ला तर कधी गेटवे आॉफ इंडीया, कधी नेहरू सेंटरला जमत असू. मला आठवतय, एकदा सुरूवातिच्या आऊटडोअर सेशन मध्ये सर आम्हाला अडोर हाऊसला घेऊन गेले. वर्गात आम्हाला हिस्टरी ऑफ आर्ट लेक्चर सुरू पण झाले नव्हते. पण भिसे सरांनी आम्हाला प्रोग्रेसीव आर्टीस्ट ग्रूप मधील चित्रकिरांबद्दल तेव्हा कल्पना दिली होती. तेव्हा अडोर हाऊसमध्ये आर्ट गॅलरी चे इंटेरियर, फर्निचर काम सुरू होते.
त्याच दर्मयान एकदा नेहरू सेंटरमधील जिन्याकडचे हुसेनजींचे मोठे चित्र चित्र दाखवत त्यांच्या गोष्टी सांगत असताना गावडे सर बोलले .. तो बघा … आपला देव चाललाय ..
आणि आम्ही विद्यार्थी त्यांकडे धावत गेलो.
बरं .. मला हेच का ते हुसैन माहीत असण्याचे कारणच नाही.
कुणी एकाने पाया पडले …आम्ही देखील पाया पडलो अन् सहीसाठी हात पुढे केला. मग इतर विद्यार्थ्यांनी पेन काढून हातावर त्यांच्या सह्या घेतल्या.
मला बॅगमध्ये छोटी फोननंबरची डायरी ठेवायची सवय होती . ती काढली अन् त्यातील पान पुढे केले.
फक्त कोणीतरी मोठा कलाकार आहे हे एवढेच तेव्हा माहीत होते पण जसजसा कलेचा अभ्यास सुरू केला तसतसे त्यांची चित्र पाहण्याचा मोह कधीच टाळता आला नाही.
मग कधीतरी आपलेही यांच्यासोबत कधी चित्रप्रदर्शन व्हावे असेही कधीतरी वाटून गेले असता काही वर्षांपुर्वी बंगलोरला एका चॅरिटी शो ला हुसैनजी व अशा अनेक चित्रकारांसोबत माझेही चित्र झळकले.
ते एक चॅरिटी अॉक्शन असल्यामुळे माझ्या तेथे नमूद केलेल्या किमतीपेक्षा दुप्पट किमतीत माझे चित्र विकले गेले हा आणखी एक आनंद.
ही सही त्यांच्या चित्रापेक्षा काही कमी नाही.
हा एक ठेवा ..
????????????